हृदयविकार म्हटलं की छातीत दुखणे, अस्वस्थता ही लक्षणे झालीच पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यायला हवी तसेच एकदा अँजिओप्लास्टी झाली म्हणून पुन्हा आजार वाढणार नाही असे गृहित धरुन चालणार नाही. मात्र योग्य आहार विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी चाचण्या उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी ह्रदयविकाराचा झटका टाळू शकतात.

बॅडमिंटन खेळून एक ३१ वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनिअर घरी परतला तेव्हा अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले; आणि उलटीही झाली हे काहीतरी वेगळे आहे अशी शंका आल्याने ते हॉस्पिटलला पोहोचले पण उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यालाच अचानक झालेला ह्रदयाघात (SUDDEN CARDIAC DEATH) म्हणतात. यात अनेक वेळा पूर्व इशारा मिळत नसतो मात्र सर्व प्रकारचं छातीत दुखणं हार्टअटॅक असेलच असे नाही.
ह्रदय हा शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव असतो. ह्रदयाला रक्त पुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते त्यातून ह्रदयाला रक्ताचा, प्राणवायू आणि आणि आवश्यक घटकांचा पुरवठा होत असतो, यांनाच कोरोनरी आर्टरीज (CORONORY ARTERIES) म्हणतात. ज्यावेळी ह्या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्यावेळी ह्रदयाच्या ईतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व ह्रदयविकाराचा झटका येतो.
रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होमण्यामागे शुद्ध रक्तवाहिनीच्या आतील पदरात कोलेस्टेरॉल साठून होते. काही वेळा रक्त गोठून पूर्णपणे प्रवाह बंद होतो व पुढील भागात रक्त न मिळाल्याने तो भाग निर्जीव होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण त्यासोबत तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, अवेळी झोप, ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे अल्प वयात ह्रदयघात (HEART ATTACK) चे प्रमाण वाढलेले आहे. वयस्कर पुरुष व रजोनिवृत्त स्री आणि घराण्यात ह्रदयविकाराची अनुवंशिकता असल्यास विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
ज्यावेळी ह्रदयघाताची (HEART ATTACK) लक्षणे छातीत दुखणे, अस्वस्थता असताना रुग्णास विना विलंब रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. अधिक विलंब झाल्यास ह्रदयाचा जास्त भाग रक्ताअभावी आपले काम थांबवू शकतो व त्याचा अतिशय वाइट परिणाम होऊ शकतो. जेवढया लवकर आपण रक्तपुरवठा पुनुःप्रस्थापित करु शकतो तेवढा ह्रदयाचा अधिक भाग वाचू शकतो. ज्यावेळी हृदयाच्या पंपाचे काम कमी कुवतीने होते व बंद पडते त्यामुळे दम लागतो, चक्कर येते, रक्तदाब कमी होऊन शॉक बसतो, हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात तेव्हा डॉक्टरांच्या सल्याने योग्य त्या प्रकारे उपचार घेणे गरजेचे असते. काहीवेळा रुग्णाची स्तीथी काशी सुधारायची याचा विचार न करता नातेवाईक स्वतःचे मत मांडण्यात वेळ वाया घलवताना दिसतात. तर रूग्णांच्या नातेवाईकांनी तसे न करता डॉक्टरांना सहकार्य करणे अपेक्षित असते.
हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमधील रक्ताची गुठळी दूर करण्यासाठी प्रथम रक्तपातळ करणारे औषध दिले जाते, त्यानंतर जर आवश्यकता असेल तरच एंजियोप्लास्टी द्वारे रक्तवाहिन्यांच मार्ग पुन्हा अरुंद होऊ नये म्हणून स्टेंट ठेवले जातात. या स्थितीतून रुग्ण स्थिर झाल्यावर पुन्हा रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून काही औषधे घेणे गरजेचे असते.
प्रत्येक रुग्णाची वार्षिक व द्विवार्षिक तपासणी देखील नंतरच्या काळात करणे महत्वाचे असते. एक उदाहरणच द्यायच झाल तर एका रुग्णाची अँजिओप्लास्टी झाली, काही दिवसानंतर त्यांना अस्वस्थ वाटु लागले, ईसीजी काढल्यावर लक्षात आले की ते ह्रदयाशी निगडीत आहे. अँजिओग्राफी करुन पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. तात्पर्य एवढेच की एकदा अँजिओप्लास्टी झाली की पुन्हा आजार वाढणार नाही असे होत नाही. योग्य आहार, विहार, व्यायाम, नियमित तपासण्या या सर्व गोष्टी ह्रदयघात (HEART ATTACK) टाळू शकतात.
शनिकृपा हार्टकेअर सेंटर मध्ये दिल्या जाणार्‍या विना शस्त्रक्रिया उपचारपद्धती, आहार – विहारातील पथ्ये, वेळोवेळी केल्या जाणार्‍या तपासण्या यामुळे हजारो हृदयविकार रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार झाले आहेत आणि कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता हजारो हृदयविकार रुग्ण आरोग्यदायी जीवन जगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *