पावसाळ्यासाठी हेल्थ टिप्स

पावसाळा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो पण पावसाळा आला की आजारपणही आलच. आपण सध्या कोरोंना आजाराशी झुंज देत असताना पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे डायरिया, कॉलरा, वाताचे विकार होतातच पण या आजारांबरोबरच सर्दी, खोकला-पडसे यासारखे आजार सुद्धा पसरतात. याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते  आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते; त्यामुळे संसर्गजन्य आजरांची लागण होते. पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजरांसह त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, सोरियसिस यांसारखे विकारही उद्भवू शकतात. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहारच्या सेवनासह  आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेच आहे.

  • पावसाळ्यात गरम करून थंड केलेले स्वछ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील बॅक्टीरिया नष्ट होतात.
  • जर तुम्हाला काही जखमा किंवा कापले असल्यास ताबडतोब साफ करा. कारण त्वचेला जखम असल्यास पावसाच्या पाण्यात गेल्याने जंतुसंसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा :

आपल्या आहारात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. ब्रोकोली, गाजर, हळद, आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. लसूण सर्दी खोकल्यासाठी अतिशय गुणकारी आहे. विटामीन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. श्वासनाची समस्या असणाऱ्याना आले अतिशय फायदेशीर आहे. पावसाळ्यात भरपूर पाणी प्या.

  • डासांपासून स्वतचा बचाव करा.

पावसात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. यामुळे डेंग्यू व मलेरिया यांसारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी डास प्रतिकरक औषधे, क्रीम, मच्छरदाणीयांचा वापर करावा. डासांपासून बचाव करण्यासाठी घर व आजूबाजूचा परिसर स्वछ ठेवा. घरामध्येही फुलदाणी, फिशटॅंक  यांची वेळोवेळी स्वच्छताठेवा; कारण अशा साठलेल्या स्वछ पाण्यातच डेंगु च्या डासांची पैदास होत असते.

  • पावसात भिजू नये

पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला असतो. पुरेसे ऊन नसल्याने हवेतील बॅक्टीरिया आणि जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे आपली प्रतिकरशक्ती कमकुवत होते. ह्याच कारणामुळे पावसाळ्यात सहजासहजी सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असतात. यासाठी पावसाच्या पाण्यात भिजणे टाळवेत. जर पावसात भिजल्यास गरम पाण्याने हात-पाय धुवून घ्यावेत, अंग व केस टॉवेलने पुसून घ्यावेत. कारण भिजलेल्या केसात फंगल  इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यात ओलसर कपडे घालणे टाळवेत. आणि पावसात भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत ते लगेच बदलावे.

  • बाहेर पाऊस पडत असला तरी घरी नियमित शारीरिक व्यायाम करा. कारण व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते.

पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरील काळजी जरूर घ्या. काळजी घेऊनही जर सांधेदुखी, सर्दी, ताप यासारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांशी संपर्क करा किंवा ९६८९००८०८१ ह्या नंबरवर संपर्क साधा. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. www.shanikrupaheartcare.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *